नागपूर (वृत्तसंस्था) २१०४ मध्ये विधानसभेच्या जिंकलेल्या जागांवर नव्हे, तर फक्त उर्वरित जागांवर चर्चा केली जाईल,अशा शब्दात प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी जागावाटपाबाबत भाजपची भूमिका स्पष्ट केली आहे.
युतीच्या जागावाटपावर 2014 ला जिंकलेल्या जागांवर नव्हे, तर चर्चा फक्त सीटिंग व्यतिरिक्त उर्वरित जागांवर केली जाईल, अशा शब्दात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भाजपची भूमिका स्पष्ट केली आहे. विधानसभेसाठी शिवसेना-भाजप युतीमध्ये जागा वाटपात एकमेकांच्या सीटिंग जागांना हात लावायचा नाही, ही भाजप आणि शिवसेना दोघांचीही मानसिकता आहे. चंद्रकांत पाटलांच्या या विधानामुळे शिवसेना आणि भाजप फिफ्टी-फिफ्टी जागांचे गणित नेमके कसे साधणार? हा प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान,याआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील जागावाटपाबाबत बोलताना विद्यमान जागांव्यतिरिक्त चर्चा करण्याबाबत विधान केले होते.