बोदवड, प्रतिनिधी । तालुक्यातील कोल्हाडी येथील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामपंचायतीच्या विहिरीला पाणी नसल्यामुळे बोअरवेल आहे, बोअरवेलला पाणी मुबलक प्रमाणात असूनही ग्रामपंचायतीच्या ढिसाळ नियोजनामूळे नागरिकांचे हाल होत आहे.
तालुक्यातील कोल्हाडी येथे नागरिकांच्या पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामपंचायतीच्या विहीरीला पाणी नसल्यामूळे बोअरवेल कार्यान्वयीत आहे. याच बोअरवेल मधून पाणी विहीरीत व त्यापूढे पाण्याच्या टाकीतून ग्रामस्थांना सोडले जाते. बोअरवेलला पाणी मुबलक प्रमाणात असूनही ग्रामपंचायतीच्या ढिसाळ नियोजनामूळे गावकऱ्यांना तहानलेले रहावे लागत आहे. गावात पंचायत समिती सदस्या असूनही स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनावर वचक नसल्याचे नागरिकांकडून बोलले जात आहे.
गेल्या दोन महिन्यापांसून मासिक बैठक झालेली नसल्याने ग्रामस्थांना कृत्रिम पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. पाण्याचा प्रश्न तातडीने मार्गी लावावा यासाठी ऊपसरपंच तुकाराम राणे यांनी गटविकास अधिका-याना तिव्र पाणीटंचाईचा विषय कळविल्यावर गटविकास अधिकारी संतोष नागतिळक यांनी कोल्हाडी येथे भेट दिली. यादरम्यान दस्तरखुद्द लोकनियूक्त सरपंचांनी गटविकास अधिका-याना भेटणेच टाळले. सरपंच महिला नामधारी असून संपुर्ण कारभार हे दिर सांभाळत असल्याचे ऊपसरपंच तुकाराम राणे यांनी दिलेल्या निवेदनात नमुद केले आहे.
कोल्हाडी गावच्या पाणीप्रश्न पेटलेला असतांना ग्रामपंचायतीच्या विहीरीवरुन पाणी विक्रीचा प्रकार ऊघडकीस आला आहे. हे पाणी थेट लोकनियूक्त महिला सरपंचाच्या दिराने विकले असल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. लोकनियूक्त महिला सरपंच नामधारी असून संपुर्ण कारभार दिर ज्ञानेश्वर सुरळकर पाहत असल्याचे तक्रारीत नमुद आहे. आमदार चंद्रकांत पाटिल यांनी स्वखर्चाने बोअरवेल दिली होती. त्यात 200 फुटा खालील साहित्याचा खर्च ऊपसरपंच तुकाराम राणे यांनी केला होता. ग्रामपंचायतीच्या विहीरीला पाणी नसल्याने याच बोअरवेल वरुन विहीरीत व त्यापूढे पाण्याच्या टाकीतून ग्रामस्थांना पाणीपुरवठा केला जातो. याच बोअरवेल साठी स्वतंत्र डिपी पाहिजे परंतू, याबाबतचा ठराव ग्रामसेवक देत नसल्याचे तक्रारीत नमुद आहे.
याबाबत गटविकास अधिकारी संतोष नागतिळक यांच्याशी संपर्क साधला असता, कोल्हाडी गावात एक महिना झाले तिव्र पाणीटंचाई आहे याबाबत प्रत्यक्ष पाहणी केली. गावात पाणी आहे परंतू नियोजन नाही. सरपंच गावाला सहकार्य करीत नाही असे गावक-याचे म्हणणे आहे. याबाबत ग्रामसेवक करवते व सरपंच यांना सक्त सुचना देणार आहोत. स्वत: महिलांशी बोललो असता गटारी तुंबलेल्या व पाणीप्रश्न अग्रणी होता. त्यामूळे ऊद्या आढावा घेऊन परवापर्यंत काहीतरी ठोस निर्णय धेऊ असे त्यांनी कळविले. पाणी विक्रीबाबत विचारले असता हा वेगळा विषय असल्याने त्याची सखोल चौकशी करुन कार्यवाही करणार असल्याचे गटविकास अधिका-यानी कळविले.
यावेळी ऊपसरपंच तुकाराम राणे, सदस्य रामा मु्-हा चौधरी, अमोल जुंबळे, पांडूरंग वाघ, इश्वर सोनार, हरी बोंडे, संजय नेवल, निवृत्ती जुंबळे, गणेश निकम, मधुकर निकम, ऊज्जवला ढाके, नलिनी ढाके, अरुण सुशीर, मंगल चौधरी, ध्यानेश्वर निकम, सचिन शिंदे, इंदबाई सोनवणे, प्रदीप सावळे, श्रीकांत पाटिल, सुनिल ढाके, बळीराम ढाके आदी उपस्थित होते.