Home क्राईम मातीच्या घराचे छत कोसळले; एका मुलाचा मृत्यू, दुसरा गंभीर जखमी!

मातीच्या घराचे छत कोसळले; एका मुलाचा मृत्यू, दुसरा गंभीर जखमी!

0
354

पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पाचोरा शहरातील कृष्णापुरी परिसरात एक अत्यंत हृदयद्रावक घटना घडली आहे. मुसळधार पावसामुळे एका जुन्या मातीच्या घराचे छत अचानक कोसळले. या दुर्घटनेत दोन मुले ढिगाऱ्याखाली दाबले गेले. ही घटना सोमवारी दुपारी घडली आहे. या दुदैवी घटनेत महेश नितीन राणे (वय १२) या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, योगेश बाळू पाील (वय १४) हा मुलगा गंभीर जखमी झाला आहे. या घटनेबाबत पाचोरा पोलीसात नोंद करण्यात आली आहे.

गेल्या काही दिवसांपासून पाचोरा परिसरात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे जुन्या मातीच्या घरांची पडझड होण्याच्या घटना वाढत आहेत. कृष्णापुरीतील ही दुर्घटना याच मालिकेतील असून, यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तात्काळ धाव घेऊन मदतकार्य सुरू केले. नागरिकांनी ढिगारा बाजूला करून मुलांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. गंभीर जखमी झालेल्या योगेश चव्हाण याला तातडीने पाचोरा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. स्थानिक नागरिकांनी मदतकार्य सुरू केल्यानंतर प्रशासनानेही दुर्घटनेची दखल घेत त्वरित मदतकार्यासाठी यंत्रणा तैनात केली. स्थानिक प्रशासनाने पंचनामा करून मृतकाच्या कुटुंबाला आणि जखमी मुलाला तातडीने सरकारी मदत उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. या घटनेबाबत पाचोरा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस नाईक महेंद्र पाटील हे करीत आहे.


Protected Content

Play sound