परप्रांतीय व्यापाऱ्याला लुटणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या; पोलीस अधिक्षक महेश्वर रेड्डी यांची माहिती

जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । कॉपर तारांचे भंगार देण्याचा बहाणा करून आंध्रप्रदेशातील एका व्यापाऱ्याला जळगाव तालुक्यातील भादली गावात बोलवून ५ जणांनी बेदम मारहाण करून लुटल्याची धक्कादायक घटना सोमवारी ९ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता समोर आली आहे. याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल होताच पोलीसांनी मंगळवारी १० डिसेंबर रोजी रात्री ११ वाजता पाचही हल्लेखोर यांना अटक करण्यात आलीआहे.

दुर्गावेंकटेशराव सूर्यनारायण काटाकोटा वय-४१, रा. भेदा पांडू मंडल, वेस्ट गोदावरी राज्य आंध्र प्रदेश हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. कॉपर तारांचे भंगार खरेदी विक्रीचे व्यवसाय करत आपला उदरनिर्वाह करतात. गेल्या आठवड्यात त्यांना एका व्हाट्सअपवरून कॉपरचे भंगार विक्री असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार ते भंगार पाहण्यासाठी जळगावला येण्यासाठी निघाले. सोमवारी ९ डिसेंबर रोजी सकाळी ८.३० वाजता व्यापारी जळगावात दाखल झाले. त्यानंतर रिक्षाने भादली गावातील चहाच्या टपरीवर थांबले. तेथूनच व्यापाऱ्याने मोबाईलधारकाला फोन लावला,त्यानुसार मोबाईलधारकाने चहा टपरीवाल्याशी फोनवर बोलणं केले. त्यानुसार चहा टपरीवाल्याने व्यापाऱ्याला दुचाकीवर बसवून गावाच्या बाहेर असलेल्या पाठचारी जवळील पंप हाऊस येथे नेले. चहा टपरीवाल्यासह इतर अनोळखी ४ जणांनी व्यापाऱ्याला पकडून मारहाण करून त्यांच्याजवळ सोन्याची साखळी, मोबाईल, महागडी घड्याळ जबरदस्ती हिसकावले, त्यानंतर व्यापाऱ्याच्या फोन-पे वरून ५० हजार आणि ४० हजार असे एकुण ९० हजार रुपये ऑनलाईन बळजबरीने ट्रान्सफर करून घेतले आणि पसार झाले. याप्रकरणी मंगळवारी १० डिसेंबर रोजी रात्री नशिराबाद पोलीस ठाण्यात धावघेवून तक्रार दिली. त्यानुसार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान पोलीसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर अवघ्या काही तासातच पाचही हल्लेखोरप्रद्यूम्न गुलाब पवार वय-२२, अमजीत भास्कर भोसले वय ३५, पप्पू गुलाब पवार वय २३, सोन्या उर्फ सोना गुलाब पवार वय २८, क्रीश उर्फ किरेश रफिक पवार वय २४ सर्व रा. हलखेडा ता.मुक्ताईनगर यांना अटक करण्यात आली आहे. अशी माहिती जिल्हा पोलीस अधिक्षक महेश्वर रेड्डी यांनी दिली. याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश देशमुख करीत आहे.

Protected Content