Home धर्म-समाज फैजपूर शहरातील रस्त्याच्या कामाला अखेर लाभला मुहूर्त

फैजपूर शहरातील रस्त्याच्या कामाला अखेर लाभला मुहूर्त

0
54


फैजपूर ता. यावल प्रतिनिधी। फैजपूर शहरातील शिवाजी नगर भागातील जेष्ठ नागरीक संघपासून ते फैजपूर बस स्टॅण्ड पर्यँतच्या रस्त्याला मुहूर्त सापडला आहे. यामुळे या भागातील नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.

फैजपूर शहरातील शिवाजी नगर भागातील जेष्ठ नागरीक संघपासून ते फैजपूर बस स्टॅण्ड पर्यँत चा रस्ताचे काम गेल्या दहा वर्षापूर्वी करण्यात आले होते.कालांतराने या रस्त्याची दुरावस्था झाल्यामुळे या रस्त्याच्या कामाची मागणी पुढे आली होती या रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्यासाठी रस्त्याची लेव्हल करून त्यात संपूर्ण स्टील(आसारी) वापरून त्याची बांधणी करून त्यावर सिमेंट वापर करून काँक्रीटीकरण करण्यात येत आहे. हा रस्ता काँक्रीटीकरणाच्या प्रतीक्षेत होता.आता उत्तम प्रकारे काम होत असल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.आज या कामाची पाहणी बांधकाम सभापती हेमराज चौधरी,काँग्रेस गटनेता कलिम खां मण्यार,राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेता शेख कुर्बान, सामाजिक कार्यकर्ते रविंद्र होले,नगरसेवक देवेंद्र बेंडाळे,प्रभाकर सपकाळे यांनी केली.

 


Protected Content

Play sound