बडोदा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | गुजरात मधील बडोदा येथे स्टॅच्यू ऑफ युनिटीकडे जाणारा मुख्य रस्ता पावसामुळे व येथे आलेल्या पुराच्या पाण्यामुळे उखडला आहे. या मार्गावर आता केवळ एकरी वाहतूक सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे या रस्त्याच्या कामाबद्दल देखील आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाऊ लागले आहेत.
बडोदा येथे सरदार वल्लभ भाई पटेल यांचा मोठा पुतळा उभरण्यात आला आहे. या पुतळ्याला असे नाव देण्यात आले आहे. या पुतळ्यापर्यंत जाण्यासाठीस्टॅच्यू ऑफ युनिटी मुख्य रस्ता तयार करण्यात आला आहे. हा रस्ता पुराच्या पाण्यात तुटून गेला आहे. डॅमच्या पाण्यामुळे हा रस्ता तुटून गेला आहे. पाण्यामुळे रस्त्याचे मोठे नुकसान झाले असून हा रस्ता दुरुस्त करण्यासाठी अनेक महिन्यांचा कालावधी लागू शकतो. पुस कमी झाल्यावर हा रस्ता पुन्हा नव्याने बांधवा लागणार आहे.