एरंडोल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | एरंडोल शहराच्या वाढीत नवीन वसाहती मोठ्या प्रमाणात भर पडली आहे आज घडीला ५० च्या वर नवीन वसाहतीची संख्या आहे पण रहिवासी अजून मूलभूत सुविधा पासून वंचित आहेत तीन चार वसाहती सोडल्या तर रस्त्याची अवस्था खूपच वाईट आहे. सर्व बाजूला चिखल व पाणी साचले आहे त्या मुळे साथीचे रोग पसरण्याचे चित्र आहे. चालूच नवीन वसाहतीत नवीन पाईपलाईन टाकण्याचे काम झाले आहे.
परंतु ठेकेदाराने पाईपलाईन साठी केलेले खडे व्यवस्थित बंद केले नाही व नवीन केलेल्या गटारी देखील व्यस्थित नाहीत त्याबद्दल रहिवाशांची तीव्र नाराजी आहे. गेल्या सहा महिन्यांपासून एरंडोल नगर पालिकेला कायमस्वरूपी मुख्याधिकारी नाही म्हणून एरंडोल न पा प्रशासन रामभरोसे आहे. सदर नवीन वसाहती मधील रस्त्यावर मुरूम टाकून रस्ता दुरुस्त करावा अशी रहिवाशांची मागणी आहे