Home Cities अमळनेर नात्याला काळीमा, बापाकडून पोटच्या मुलीवर दीड वर्षांपासून अत्याचार

नात्याला काळीमा, बापाकडून पोटच्या मुलीवर दीड वर्षांपासून अत्याचार


अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर शहरात बाप व मुलीच्या  नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. शहरातील एका भागात राहणाऱ्या नराधमाने पोटच्या १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर गेल्या दीड वर्षांपासून अत्याचार केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी नराधम बापाविरोधात अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

अमळनेर शहरातील एका भागात १४ वर्षीय अल्पवयीन मुलगी वास्तव्याला आहे. तिच्या आई व वडीलांचे भांडण झाल्यावर तिची आई बाहेरगावी निघून जात होते. त्यामुळे घरी पिडीत मुलगी आणि तिचा नराधम बाप हे दोघेच राहत होते. रात्री जेवन करून झोपल्यानंतर नराधम बापाने पोटच्या मुलीवर लैंगिक अत्याचार सुरू केले. हा प्रकार तिने कुणालाही सांगितला तर तुझ्या आईला आणि तुला ठार मारेल अशी धमकी दिली. त्यामुळे पिडीत मुलीने तिच्या सोबत घडलेला प्रकार कुणाला सांगितला नाही. गेल्या दीड वर्षांपासून हा प्रकार सुरूच होता. तिची ही पिडा कुणाला सांगावे हे देखील कळत नव्हते. १८ जुलै रोजी तिची आई आणि आजी घरी आल्यानंतर त्यांनी घडलेला प्रसंग कथन केला. त्यावेळी तिच्या आई व आजीला प्रचंड धक्का बसला. त्यांनी तातडीने मुलीला सोबत घेवून अमळनेर पोलीस ठाणे गाठले. पिडीत मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून अमळनेर पोलीस ठाण्यात नराधम बापाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अनंत अहिरे करीत आहे.


Protected Content

Play sound