Home प्रशासन  सावदा पोलिसांच्या कार्यतत्परतेचा आ. चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते गौरव

 सावदा पोलिसांच्या कार्यतत्परतेचा आ. चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते गौरव


सावदा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । सावदा पोलिस स्टेशनच्या कार्यक्षम पथकाने दाखल दरोड्याच्या गुन्ह्यातील चार आरोपींना अल्पावधीत अटक करून गुन्ह्यातील संपूर्ण मुद्देमाल हस्तगत केला. या उल्लेखनीय व कौतुकास्पद कामगिरीचा गौरव म्हणून मुक्ताईनगर विधानसभेचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते प्रभारी अधिकारी एपीआय विशाल पाटील यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी उपस्थितांनीही सावदा पोलिसांच्या कार्यक्षमतेचे मनापासून कौतुक केले.

घटनेनंतर सावदा पोलिसांनी अत्यंत शिस्तबद्ध आणि जलद कारवाई करत चारही आरोपींना अटक केली व गुन्ह्याशी संबंधित सर्व मुद्देमाल जप्त केला. पोलिसांच्या या तत्परतेमुळे नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून, स्थानिक गुन्हेगारीला मोठा आळा बसला आहे. पोलिसांच्या या धाडसी व अचूक कामगिरीमुळे संपूर्ण विभागात कौतुकाची लाट पसरली आहे.

सत्कार समारंभात आमदार चंद्रकांत पाटील यांनी सावदा पोलिसांचे मनोबल वाढवणारे उद्गार काढत म्हटले की, गुन्हेगारी आटोक्यात ठेवण्यासाठी पोलिसांनी वेळेवर दाखवलेली तत्परता प्रशंसनीय आहे. अशा कार्यक्षम पोलिस दलामुळे परिसरातील कायदा व सुव्यवस्था अधिक मजबूत होईल आणि नागरिकांना न्याय मिळवून देण्यावरचा विश्वास अधिक बळकट होईल.

या कार्यक्रमाला मुख्याधिकारी भूषण वर्मा, माजी उपनगराध्यक्ष श्याम अकोले, माजी नगराध्यक्ष राजेंद्र चौधरी, जे. के. भारंबे, सुरज परदेशी, फिरोज खान पठाण यांच्यासह अनेक मान्यवर आणि कार्यकर्ते उपस्थित होते. सर्वांनी एकमुखीने सावदा पोलिसांच्या जलद व अचूक कारवाईचे अभिनंदन केले.


Protected Content

Play sound