गुंडांवर कारवाईसाठी नूतन मराठा महाविद्यालयात कर्मचाऱ्यांचे निषेध आंदोलन

02f32a8e 8d38 488c a958 9c0066314138

जळगाव, प्रतिनिधी | येथील नूतन मराठा महाविद्यालयाच्या आवारात गुंडांचा वावर वाढला असून त्यांच्यावर गंभीर आरोप असताना जिल्हापेठ पोलीस काहीच कारवाई करीतत नसल्याने त्यांच्या निषेधार्थ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एल.पी. देशमुख यांनी पत्रकार परिषद घेऊन १० जुलै रोजी काम बंद आंदोलन छेडण्यात येणार असल्याचा इशारा दिला होता. मात्र विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेता काम बंद न करता केवळ काळ्या फिती लावून कर्मचा-यांनी आज सकाळी ११.०० वाजता निषेधाच्या घोषणा देत निदर्शने केली.

 

या नंतरही संबंधितांवर कारवाई न झाल्यास २९ जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढणार असल्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. महाविद्यालयीन कर्मचा-यांच्यावतीने प्राचार डॉ.एल.पी. देशमुख यांनी ६ जुलै रोजी पत्रकार परिषद घेऊन आरोप केला होता की, गुंडगिरी करणा-या विजय भास्कर पाटील, मनोज भास्कर पाटील आणि पियुष पाटील यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप असताना ते महाविद्यालय आवारात गुंडगिरी करीतअसतात. त्यांचा बंदोबस्त करण्याची कारवाई न झाल्यास कामबंद आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला होता. त्यानुसार आज कामबंद आंदोलन करण्यात येणार होते, मात्र विद्याथ्यांचे हित लक्षात घेवून केवळ काळ्याफिती लावून आणि घोषणाबाजी करून कर्मचा-यांनी आपला निषेध नोंदविला. यानंतरही गुंडांवर कारवाई न झाल्यास २९ जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. या वेळी मोठया संख्येने कर्मचारी उपस्थित होते.

Protected Content