फेकरी येथील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्याचे विविध मागण्यांसाठी आमरण उपोषण

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शासकीय औद्योगिक प्रशिक्षण अहर्ताधारक उर्वरित व पात्र प्रकल्पग्रस्त प्रशिक्षणार्थीला ज्येष्ठतेनुसार नोकरी मिळावी तसेच नुकसान भरपाईसह फरकाची रक्कम मिळावी, यासह बोगस भरती करणाऱ्यास दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करून त्यांना कामावरून कायमस्वरूपी बरखास्त करावे, या मागणीसाठी प्रकल्पग्रस्त भुसावळ तालुक्यातील फेकरी येथील प्रकल्पग्रस्त शेतकरी भागवत भादू चौधरी जी.एस. मैदानात बुधवार १४ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजेपासून बेमुदत उपोषणाला सुरुवात केली आहे.

त्यांनी दिलेल्या प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे की, भुसावळ येथील महानिर्मिती कंपनीने प्रशिक्षणाच्या माध्यमातून शासकीय औद्योगिक प्रशिक्षण अहर्ताधारक उर्वरित व पात्र प्रकल्पग्रस्त प्रकुशल प्रशिक्षणार्थींना नोकरी देण्याकरता सेवेमध्ये समाविष्ट होईपर्यंत प्रशिक्षण योजना राबवलेली आहे. यात भरती प्रक्रियेत भुसावळ औष्णिक विद्युत केंद्र दीपनगर कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांनी दलालाच्या मार्फत बोगस पद्धतीने प्रकल्पग्रस्त यांच्या परस्पर मिटिंगा भरून २०१२ च्या भरती प्रक्रियेत नियमबाह्य प्रकल्पग्रस्त यांची भरती केलेली आहे. त्यामुळे खऱ्या प्रकल्पग्रस्तांना या नोकरीपासून वंचित ठेवलेले आहे. त्यामुळे प्रशासनाने या भरती प्रक्रियाचे पारदर्शकपणे चौकशी करून व न्याय मिळवून द्यावा व दोषींवर कायदेशीर कारवाई करून त्यांना कायमस्वरूपी नोकरीवरून बरखास्त करावे, या मागणीसाठी प्रकल्पग्रस्त असलेले भागवत चौधरी यांनी बुधवारी १४ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजेपासून जळगाव शहरातील जी.एस. मैदानात आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही, तोपर्यंत हे उपोषण सुरूच राहील, असा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला आहे.

Protected Content