पाचोरा (प्रतिनिधी)। येथील ११ मार्च रोजी आबाजी माता मंदिराचा २० वा वर्धापनदिन साजरा करण्यात आला. या निमिताने महाप्रसादाचेही आयोजित करण्यात आले होते. दरवर्षी वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला येथे हजारो भाविकांची गर्दी होत असते. वर्धापन दिन सोहळा हा गेल्या २० वर्षांत पर्दापण करीत असून या ट्रस्टने धार्मिक कार्यक्रमांसह सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमही मोठ्या प्रमाणात राबवले जाते.
यासाठी विविध क्षेत्रात मोलाचे कार्य या ट्रस्टने केले असून वर्षभर उपक्रम राबवले जात असतात. आज ११ मार्च रोजी सकाळी ११ ते ३ या वेळेस महाप्रसाद अन्नदानाचा कार्यक्रम करण्यात आला असून यावेळी ३५०० हजार भाविकांना महाप्रसादाचा लाभ मिळाला आहे. पाचोरा भडगाव रोडवरील अंबाजी माता मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त परिसरात रोषणाई करण्यात आली होती. तसेच देवी-देवतांचे भव्य देखावे लक्ष वेधून घेत होते. दिवसभर हजारो भाविकांची प्रचंड मोठी रांग दर्शन घेण्यासाठी लागली होती.
पहा। आयोजित केलेल्या महाप्रसादाच्या कार्यक्रमात भाविकांची गर्दी