पुढच्या १२ तासांत भीषण चक्रीवादळाची शक्यता

chakri vadal

 

चेन्नई (वृत्तसंस्था) भारतीय हवामान विभागाने (IMD) शनिवारी २७ एप्रिल रोजी हिंद महासागर आणि दक्षिणपूर्व बंगाल खाडीलगतच्या क्षेत्रांना भीषण चक्रीवादळाच्या धोक्याचा इशारा दिला आहे. या क्षेत्रालगतच्या राज्यांना येत्या १२ तासांत चक्रीवादळ भीषण रुप धारण करण्याचा इशारा देण्यात आला आहे. तसेच मच्छीमारांनाही रविवारी समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे.

 

हवामान विभागाने तामिळनाडू, पाँडिचेरी समुद्र किनारे, कोमोरिन भाग, मन्नारची खाडी आणि केरळच्या समुद्रालगतच्या भागांना धोक्याचा इशारा दिला आहे. रविवारी, १०० किलोमीटर प्रति तासानं वारे वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे दक्षिण पश्चिम बंगाल खाडीत समुद्राच्या उंचच उंच लाटा येऊ शकतात. आयएमडीच्या म्हणण्यानुसार, पुढच्या १२ तासांत हे वादळ चक्रीवादळाचे रुप धारणं करु शकते आणि त्यानंतर पुढच्या २४ तासांच प्रचंड भीषण चक्रीवादळाला समुद्रालगतच्या राज्यांना सामोरे जावे लागू शकते.

Add Comment

Protected Content