मुंबईत मतदानाआधी प्रिसायडींग ऑफीसरचा ह्रदयविकाराचा झटका आल्याने निधन

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | राज्यातील पाचव्या आणि शेवटच्या टप्प्यात निवडणूक होत असून 20 मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडत आहे. या पार्श्वभूमीवर मतदान केंद्रात कोणतीही गैरसोय होऊ नये प्रशासनाने खबरदारी घेतली आहे. अशातच मुंबईतील वडाला येथील बुथ क्रमांक १८९ मध्ये मोठी धक्कादायक घटना घडली आहे. या केंद्रातील प्रिसायडींग ऑफीसरचे ह्रदयविकाराचा झटका आल्याने निधन झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार वृत्त असे की, मुंबईतील मुंबई दक्षिण-मध्य लोकसभा मतदार संघात वडाळा विधानसभा मतदार संघ झोन 20 मधील बूथ क्रमांक 189 सेंट पॉल मुलांची शाळा येथे निवडणूक अधिकाऱ्यांकडून प्रिसायडिंग ऑफिसर म्हणून नेमणूक करण्यात आलेल्या सुनील लक्ष्मण गवळी यांना अचानक छातीत दुखून ते बेशुद्ध पडले होते. त्यानंतर, पोलिसांच्या मदतीने त्यांना तत्काळ केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, त्यांच्यावर तातडीचे उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला.

 

Protected Content