यावल, प्रतिनिधी | राज्यातील विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम कुठल्याही वेळी जाहीर होण्याच्या मार्गावर असुन यंदाच्या या विधानसभा निवडणुकीकरीता रावेरमतदार संघातुन सर्वच पक्षांचे कार्यकर्ते व पदाधिकारी जोमाने संभाव्य उमेदवाराच्या मोर्चे बांधणीस लागले आहेत. तर युतीतर्फे ना. हरीभाऊ जावळे तर आघाडीतर्फे माजी आमदार शिरीष चौधरी यांंच्या नावांची जोरदार चर्चा आहे.
२०१४च्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपा, शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस या पक्षांनी स्वतंत्र निवडणुक लढवली होती. त्या दृष्टीकोणातुन बघीतल्यास २०१९ची सार्वत्रीक निवडणुकीत भाजपा सेना युती आणि कॉग्रेस पक्ष व राष्ट्रवादीची आघाडी होणार असल्याचे जवळ जवळ निश्चीत झाल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. रावेर विधानसभेची २०१४ निवडणुकीही भाजपाच्या वतीने आमदार हरीभाऊ माधव जावळे कॉंग्रेस पक्षाचे शिरीष मधुकर चौधरी, शिवसेनेतर्फ प्रल्हाद महाजन, राष्ट्रवादीकडुन गफ्फार मलीक हे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे होते. सर्वेच पक्षाच्या उमेदवार निवडणुकीत असतांना देखील खरी लढत ही भाजपाचे हरीभाऊ जावळे आणी कॉंग्रेसचे उमेदवार शिरीष चौधरी यांच्यात झाली होती. यात भाजपाचे हरीभाऊ जावळे यांना ६५ हजाराहुन अधिक मते मिळवली होती तर कॉंग्रेसचे शिरीष चौधरी यांना ५५ हजार इतकी मते मिळुन १० हजारापेक्षा जास्तमतांनी चौधरी यांचा पराभव झाला होता. रावेर विधानसभा क्षेत्रात येणाऱ्या रावेर नगरपालीका वर काँग्रेसचे नगरसेवक असून पंचायत समितीवर सदस्य निवडुन आले आहेत. रावेर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये काँग्रेसचे संचालक आहे. रावेर व यावलच्या दोघ पंचायत समीती व कृषी उत्पन्न बाजार समित्या या भाजपाच्या ताब्यात आहेत. कॉंग्रेसचे फैजपुर नगर परिषद व यावल नगर परिषदेवर नगराध्यक्ष जरी काँग्रेस पक्षाचा नसला तरी नगरसेवकाचे संख्याबळ लक्षणीय आहे. यावल तालुक्यातील रावेर मतदारसंघातील ग्रामपंचायतीवर काँग्रेस आणि भाजपाचे सम समान वर्चस्व आहे. आज जरी राजकीय वातावरण तापवण्याकरीता काही विविध पक्षातील कार्यकर्ते इच्छुक उमेदवारांच्या विविध नांवाची चर्चा करीत असले तरी भाजपा शिवसेना युती कडुन विद्यमान आमदार हरीभाऊ जावळे हे तर कॉंग्रेस व राष्ट्रवादीच्या आघाडीकडुन माजी आमदार शिरीष चौधरी हे सर्वाधीक तुल्यबळ व प्रभावी उमेदवार असल्याची चर्चा राजकीय गोटात होत आहे.