भुसावळ प्रतिनिधी । शहरातील प्रोफेसर कॉलनी समोरील लिंबाच्या झाडाखाली कल्याण मटका जुगाराचा अड्डा चालविणाऱ्या एका आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील प्रोफेसर कॉलनी समोरील लिंबाच्या झाडाखाली (सार्वजनिक जागा) पंडित भालचंद्र कोळी (वय-65) रा.महादेव वाडी, अट्रवल ता.यावल हा आरोपी स्वतःच्या फायदासाठी कल्याण मटका जुगाराचा खेळ चालवत असल्याची माहिती पो.नि.दिलीप सो यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी दि.30 सप्टेंबर रोजी रात्री 11.45 वाजेच्या सुमारास सापळा रचला. त्यावेळी आरोपी कल्याण मटका जुगाराचा खेळ खेळताना 1 हजार 130 रुपये रोख व सट्टा जुगाराचा साहित्यासह मिळून आल्याने त्याला ताब्यात घेण्यात आले असून मुंबई जुगार ऍक्ट कलम-12 (अ)प्रमाणे कार्यवाही करण्यात आली आहे.
उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन राठोड, व पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.निरीक्षक रावसाहेब कीर्तिकर, पो.हे.का संजय भदाणे, पो.ना.रमण सुरळकर, पो.का.विकास सातदिवे, ईश्वर भालेराव यांनी कार्यवाही केली आहे.