जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील फुले मार्केट परिसरात हॉकर्स आणि व्यापाऱ्यांचा वाद झाला होता. यात एका व्यापाऱ्याला दोन जणांनी धमकावले होते. दरम्यान शहर पोलीसांनी धमकावणाऱ्या दोघांवर कारवाई करत शु्रवारी ३ फेब्रुवारी रोजी फुले मार्केटमधून पायी धिंड काढली.
सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, महात्मा फुले मार्केटमध्ये गुरुवारी २ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास एका व्यापारी त्याचे दुकान उघडत असतांना चाकू दाखवत दमदाटी व धमकावल्याची घटना घडली होती. या मुळे संतप्त व्यापारीधारकांनी दुपारीपासून फुले मार्केट बंद ठेवून निषेध व्यक्त करत महापालिका आयुक्त, पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले होते. दमदाटी व धमकावण्यासंदर्भात शहर पोलीस ठाण्यात कोणतीच तक्रार आलेली नव्हते.
शहर पोलिसांत दुपारी कोणत्याच व्यापाऱ्याने तक्रार दिली नव्हती. सायंकाळी एक व्यापारी दुकानातून डब्बा घेत असताना दोघांनी त्याला धमकावले होते. याप्रकरणात देखील कुणीही पोलिसात तक्रार केली नाही. शुक्रवारी ३ फेब्रुवारी रोजी सकाळी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय ठाकूरवाड, पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे, शोध पथकातील पोलीस कर्मचारी यांनी धमकी देणाऱ्या मनीष अरुण इंगळे वय-१८ रा.वाल्मिक नगर व गणेश उर्फ डेब्या दिलीप सोनवणे वय-२० रा.वाल्मिक नगर, जळगाव यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करून फुले मार्केट परिसरातून धिंड काढली होती.