कोरोना महामारीतही शेतकऱ्यांचे हाल

जामनेर, प्रतिनिधी । सध्या कोरोनाच्या महामारीने सर्वत्र थैमान घातले आहे. सर्व सामान्य नागरिकांचे उद्योगधंदे ठप्प झाल्याचे चित्र सगळीकडे दिसत आहे. त्यातच मे –  जुन हे महिने आता प्रामुख्याने शेतीची मशागत करून बि-बियाणे रासायनिक खते आदी खरेदी करण्याच्या लगबगीत बळीराजा आहे. यात शेतकऱ्यांचे हाल होत आहे. या निर्णयामुळे जामनेर राष्ट्रवादीकडून तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. 

 

मागील वर्षीही कोरोनामुळे बळीराजाला खुप अडचणी आल्या अजून कोरोनाची तिसरी लाट येण्याचे संकेत शासनाने दिले असुन या परिस्थितीत आर्थिकपणे बळीराजाला शेती करणे कठीण होवून बसले आहे. त्यातच केंद्र शासनाकडून रासायनिक खताचे भाव जाहीर झाले असुन त्या भावात कमी येता अजून दरवाढ केली गेली आहे. आपला देश शेतीप्रधान असल्याने शेती हा उपजिवीकेचा प्रमुख घटक आहे. परंतु केंद्राच्या अशा निर्णयामुळे बिकट परिस्थितीत निर्माण झाली आहे. या निर्णयाचा निषेध म्हणून जामनेर राष्ट्रवादीकडुन कोरोनाचे नियम पाळत तहसील कार्यालयावर मोर्चा काढला.

 

यावेळी संजय गरूड, किशोर पाटील, राजेंद्र चौधरी, डॉ. प्रशांत पाटील, प्रल्हाद बोरसे, जितेश पाटील, अनिस पहेलवान, इम्रान गफ्फार, विनोद माळी, दिपक रेशवाल, विशाल पाटील, जहिर शेख गुलाब, शेख मोहम्मद उमर आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थितीत होते.

Protected Content