भुसावळ लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ शहरातील खडका रोडवील इदगाह मैदानासमोर विनापरवाना गावठी पिस्तूल आणि एक जीवंत काडतूस बाळगणाऱ्या संशयिताला भुसावळ बाजारपेठ पोलीसांनी बुधवारी ६ नोव्हेंबर रोजी रात्री ८ वजता कारवाई केली आहे. याप्रकरणी रात्री ११ वाजता भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, याकुब मोहम्मद खान वय २४ रा. अक्सा नगर, भुसावळ हा तरूण भुसावळ शहरातील खडका रोड परिसररात गावठी पिस्तूल आणि जिंवंत काडतूस घेवून फिरत असल्याची गोपनिय माहिती भुसावळ बाजारपेठ पोलीसांना मिळाली. त्यानुसार बुधवारी ६ नोव्हेंबर रोजी रात्री ८ वाजता पोलीसांनी कारवाई करत संशयित आरोपी याकुब खान याच्याकडून गावठी पिस्तूल आणि जिवंत काडतूस जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत परदेशी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ विजय नेरकर हे करीत आहे.