Home Cities जळगाव बेळी येथील श्री कुंडलेश्वर मंदीराच्या पश्चिम द्वाराचे लोकार्पण

बेळी येथील श्री कुंडलेश्वर मंदीराच्या पश्चिम द्वाराचे लोकार्पण


WhatsApp Image 2019 03 04 at 3.20.16 PM

जळगाव (प्रतिनिधी)। येथून जवळच असलेल्या नशिराबादजवळ बेळी येथील भगवान श्री. कुंडलेश्वर मंदिराच्या पश्चिम द्वाराचे लोकार्पण माजी महसूलमंत्री आमदार एकनाथराव खडसे यांच्या करण्यात आले. याप्रसंगी उपस्थित खासदार रक्षाताई खडसे, आमदार राजुमामा भोळे, भरत महाराज, भुसावल माजी पंस उपसभापती मनीषाताई पाटील, माजी आमदार निळकंठ फालक, जिल्हा परिषदेचे शिक्षण आरोग्य सभापती पोपटतात्या भोळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय म्हस्कर, बांधकाम अभियंता श्री.येवले, पंकज महाजन, जिल्हा सरचिटणीस भालचंद पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

WhatsApp Image 2019 03 04 at 3.20.56 PM

यावेळी सदगुरू महाराज यांच्या नावाने हॉलचे लोकार्पणही करण्यात आले. तसेच मंदीर उभारणीसाठी ज्यांनी योगदान किंवा वर्गणी दिली अशा वर्गणीदारांचा सत्कार माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे यांच्याहस्ते करण्यात आला. भविष्यात रस्ते आणि पुलाच्या कामांना निधीसाठी प्रस्ताव तयार करण्याच्या सुचना आमदार राजूमामा भोळे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सुचना दिल्या आहेत.

WhatsApp Image 2019 03 04 at 3.20.23 PM


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound