Home Cities पाचोरा चर्मकार समाज बांधवांचा शिंदे गटात जाहीर पक्ष प्रवेश

चर्मकार समाज बांधवांचा शिंदे गटात जाहीर पक्ष प्रवेश


पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | पाचोरा तालुक्यातील ५० चर्मकार समाज बांधवांनी पाचोरा मतदार संघाचे आमदार किशोर पाटील यांच्या शिवालय या निवासस्थानी त्यांच्या विकास कामांचा आलेख लक्षात घेता शिवसेना शिंदे गटात जाहीर पक्ष प्रवेश केला.

यात प्रामुख्याने राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे तालुकाध्यक्ष गोवर्धन जाधव, साजगावचे माजी सरपंच गुरुलाल पवार यांच्या सह पाचोरा तालुक्यातील ५० चर्मकार समाज बांधवांनी जाहीर प्रवेश केला. याप्रसंगी नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष संजय गोहिल यांचेसह चर्मकार समाज बांधव पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Protected Content

Play sound