पतपेढीचे कार्यालय फोडून रोकड लांबविली

जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील चित्रा चौकातील जिल्हा कृषी औद्योगिक सर्वसेवा सहकारी संस्थेचे कुलूप तोडून आत प्रवेश करत रोकड चोरून नेल्याची घटना गुरूवार २ जानेवारी रोजी सकाळी ८ वाजता समोर आली आहे. याप्रकरणी रात्री १० वाजता जळगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक असे की, जळगाव शहरातील चित्रा चौकात जिल्हा कृषी औद्योगिक सर्वसेवा सहकारी संस्था पतपेढी आहे. बुधवारी १ जानेवारी ते २ जानेवारी दरम्यान पतपेढी ही बंद असतांना अज्ञात चोरट्यांनी कुलूप तोडून आत प्रवेश करत ८ हजारांची रोकड चोरून नेली. ही घटना गुरूवारी २ जानेवारी रोजी सकाळी ८ वाजता समोर आली आहे. हा प्रकार उघडकीला आल्यानंतर येथील कर्मचारी कमलाकर अभिमन ठाकरे यांनी जळगाव शहर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ गजानन बडगुजर हे करीत आहे.

Protected Content