अमळनेर (प्रतिनिधी) वीज देयकांच्या थकबाकी वसुलीसाठी विशेष मोहिम राबवुन दिलेले उदीष्ट पुर्ण केल्याबद्दल पारोळा शहरातील विद्युत सहाय्यक गौरव विनायक गावांदे-शिंपी यांचा नुकताच पुण्यात गौरवपत्र देऊन सन्मान करण्यात आला आहे.
महावितरण, महाराष्ट्र राज्य विद्युत कंपनी मर्या. मंचर जि पुणे या विभागाच्या झालेल्या वार्षिक गुणगौरव समारंभात पारोळा शहराचे विद्युत सहाय्यक गौरव विनायक गावांदे शिंपी यांनी मार्च २०१९ च्या माहिन्यात वीज देयकांच्या थकबाकी वसुलीसाठी विशेष थकबाकी वसुली मोहिम राबवुन दिलेले उदीष्ट पुर्ण केले. या उल्लेखनिय कामगिरी बद्दल व त्यांनी घेतलेल्या अपार परिश्रमामुळे मंचर विभागाच्या प्रगतीचा आलेख व नावलौकिक उंचावल्याने त्यांचे अभिनंदन करण्यात आले तसेच प्रकाश खांडेकर कार्यकारी अभियंता मंचर विभाग यांच्या सहीने नुकत्याच पार पडलेल्या वार्षिक गुणगौरव समारंभात त्यांना गौरव पत्र प्रदान करण्यात आले. विशेष म्हणजे गौरव शिंपी यांनी आपल्या नोकरीच्या सुरूवातीच्या काळातच हा गौरव प्राप्त केला असून भिमाशंकर ज्योर्तीलिंग तिर्थक्षेत्राच्या दुर्गम परिसरात त्यांनी आपली तत्पर सेवा देवुन आपल्या कामाची चुणुक दाखविली आहे. त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.