मुंबई- राज्यातील रुग्णवाढीचा वेग कायम असून, रविवारी राज्यातील रुग्णसंख्या १३ लाखांच्या पार गेली आहे. आतापर्यंत राज्यात ३५ हजारांपेक्षा करोनामुळे मृत्यू झाला आहे.
राज्यात आज दिवसभरात १८ हजार ५६ नवीन कोरोना रुग्ण आढळून आले. तर दिवसभरात ३८० रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. दुसरी दिवसभरात १३ हजार ५६५ रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. नवीन रुग्णांची भर पडल्यानं राज्यातील एकूण रुग्णसंख्या १३ लाख ३९ हजार २३२ इतकी झाली आहे. यात ३५ हजार ५७१ रुग्णांचा मृत्यू झाला असून, १० लाख ३० हजार १५ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या राज्यात २ लाख ७३ हजार २२८ रुग्ण उपचार घेत आहेत.