अमळनेर (प्रतिनिधी) गेल्या काही वर्षापासून पावसाचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत चालले आहे. त्यामुळे पक्षांची संख्या दिवसेंदिवस कमी होतांना दिसत आहे. मानवाने वृक्षलागवड करून चालणार नाही तर त्याचे संवर्धन करणे तेवढेच गरजेचे असून ‘वृक्ष वाचले तर पक्षी वाचतील’ असे प्रतिपादन शिक्षक व पक्षीमित्र अश्विन पाटील यांनी केले. ते सानेगुरुजी कर्मभूमी स्मारक प्रतिष्ठान आयोजित खान्देशस्तरीय श्रमसंस्कार छावणीत मार्गदर्शन करतांना बोलत होते.
आपल्या व्याख्यानातून शिक्षक व पक्षीमित्र अश्विन पाटील यांनी २९ मे गुरुवार रोजी अमळनेर येथील तत्त्वज्ञान केंद्रात सानेगुरुजी कर्मभूमी स्मारक प्रतिष्ठान अमळनेर संचलीत ‘खान्देश स्तरीय युवा श्रमसंस्कार छावणी’ दि. २६ ते ३१मे पर्यंतचे आयोजन केलेले आहे. या युवा संस्कार छावणीत खान्देश विभागातून अनेक विद्यार्थी विद्यार्थ्यांनीनी सहभाग नोंदवीला आहे. या शिबीरात ‘पक्षी व पर्यावरण’ या विषयावर विद्यार्थ्यांशी संवादरुपी (स्लाईड शो) सचीत्र व्याख्यानाची संधी आयोजकांनी उपलब्ध करुन दिल्याबद्दल अश्विन पाटील यांनी आयोजकांचे आभार मानले. यावेळी विद्यार्थी व मान्यवर उपस्थित होते.