यावल शहरात मोकाट फिरणाऱ्या कुत्र्यांचा धुमाकुळ

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | यावल शहरातील नगर परिषदच्या विस्तारित कार्यक्षेत्रातील वसाहतीत भटक्या कुत्र्यांमुळे नागरीकांना धोका निर्माण झाला असुन दुचाकी वाहन चालकांमध्ये या मोकाट कुत्र्यांची मोठी दहशत निर्माण झाली असुन, नगर परिषदच्या वतीने या मोकाट कुत्र्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी अद्याप पर्यंत कोणतील उपाययोजना करण्यात आल्याचे दिसुन येत नाही तरी प्रशासनाने तात्काळ या धोकादायक मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरीकांच्या वतीने करण्यात येत आहे .

यावल शहरातील विस्तारित वसाहती मध्ये भुसावळ रोड ते आयशानगर कडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर याशिवाय पांडूरंग सराफ नगर वस्ती यावल भुसावळ रस्त्यावरील फालक नगर बस थांबा अशा शहरातील विविध सार्वजनिक ठीकाणी सांयकाळी व रात्रीच्या वेळी पाच ते सात कुत्र्यांचे टोळके हे रस्त्याच्या मधोमधे बसलेले मोकाट कुत्रे एकत्र येवुन दुचाकी वाहनचालकांच्या अंगावर धावतात त्यामुळे रात्रीच्या वेळीस दुचाकी वाहनधारकांना घराबाहेर जाणे अवघड झाले आहे ,अशा वेळीस वाहनाचा तोल जावुन मोठा अपघात होवु शकतो , यावल नगरपरिषदने या मोकाट फिरणाऱ्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.

Protected Content