राष्ट्रवादीने भाजपसोबत जाण्याचा निर्णय महिन्यांपूर्वीच घेतला होता ; अजितदादांचा खळबळजनक गौप्यस्फोट

Ajit Pawar

मुंबई (वृत्तसंस्था) राष्ट्रवादीने काही महिन्यांपूर्वीच भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता. भाजप अध्यक्ष अमित शाह आणि देवेंद्र फडणवीसांसोबत राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या बैठका झाल्या होत्या. मात्र आता मोठे नेते खोटे पाडत आहेत, असा खळबळजनक गौप्यस्फोट राष्ट्रवादीचे बंडखोर नेते अजित पवारांनी भेटायला गेलेल्या कार्यकर्त्यांकडे केला आहे.

 

याबाबत एका वृत्त वाहिनीने वृत्त दिले आहे. या वृत्तानुसार भाजपसोबत जाण्याचा निर्णय हा काही महिन्यांपूर्वी घेण्यात आला होता. परंतू आता मला खोटे पाडण्याचा प्रयत्न पक्षातील ज्येष्ठ नेत्यांकडून केला जात आहे. काही महिन्यांपूर्वी अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठकाही झाल्या होत्या, मात्र मला आता शब्द फिरवायला सांगितला जातोय, असे अजित पवारांनी बारामतीतील कार्यकर्त्यांना सांगितले. महाविकास आघाडीत अडीच वर्षे शिवसेनेचा तर अडीच वर्षे राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री असा निर्णय झाला होता, मात्र शेवटच्या बैठकीत शब्द फिरवण्यात आला,असे देखील अजित पवारांनी सांगितल्याची माहिती कार्यकर्त्यांना दिली.

Protected Content