Home क्राईम अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले

अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले


जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील बेटावद येथील १५ वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी जामनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, जामनेर तालुक्यातील बेटावद येथील १५ वर्षीय मुलगी ही आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. ४ जून रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास अल्पवयीन मुलगी घरी असतांना अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेले. दरम्यान मुलीच्या नातेवाईकांनी तिचा परिसरात शोध घेतला असता मिळून आली नाही. अखेर शनिवार ४ जून रोजी जामनेर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्तीविरोधात जामनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला .पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप राठोड करीत आहे.


Protected Content

Play sound