महायुती सरकारचा मंत्रीपदाचा फॉर्म्युला ठरला !

नागपूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | विधानसभा निवडणूक निकाल लागून बराच काळ उलटून गेल्यानंतर जवळपास दहा दिवसांनी राज्यात भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा समावेश असलेले महायुती सरकार अस्तित्वात आले. सरकार अस्तित्वात आले तरी मंत्रिमंडळ विस्तार अद्यापही झाला नाही. दरम्यान, या विस्तारास 15 डिसेंबर रोजीचा मुहूर्त मिळाला आहे. नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात हा विस्तार पार पडतो आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या या सरकारमध्ये अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री असणार आहेत. महायुतीतील तीन्ही पक्षांसाठी खातेवाटपाचा फॉर्म्युलाही निश्चीत झाला असून तो 21-12-10 प्रमाणात असेल असे सांगितले जात आहे. दुसऱ्या बाजूला आपापल्या पक्षनेत्यांकडून आमदारांना मंत्रीपदासाठी फोनही जायला सुरुवात झाली आहे. अद्याप कोणाच्याही नावाची अधिकृत घोषणा झाली नसली तरी, संभाव्य मंत्रिपदाच्या यादीत नाव निश्चीत समजल्या जाणाऱ्या काही आमदारांची नावे मात्र पुढे आली आहेत. ज्यामध्ये जुन्या नव्या चेहऱ्यांना संधी मिळाल्याचे पाहायला मिळते.

नागपूर हिवाळी अधिवेशनात महायुती सरकारच्या आजच्या मंत्रिमंडळ विस्तारात एकूण 43 मंत्र्यांचा समावेश होईल असे चित्र आहे. या विस्तारातील सत्तावाटपाचे सूत्र खालीलप्रमाणे: भाजप: २१ मंत्रिपदे, शिवसेना (शिंदे गट) : १२ मंत्रिपदे, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार : १० मंत्रिपदे

Protected Content