यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | यावल येथे तालुका शारीरिक शिक्षण व क्रीडाशिक्षक महासंघाची सभा यावल तालुक्यातील प्रभात विद्यालय हिंगोणा येथे आज उत्साहात संपन्न झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी प्रभात विद्यालयाचे मुख्याध्यापक मनोज गाजरे तर प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र राज्य शारीरिक शिक्षण व क्रीडाशिक्षक महासंघाचे कार्याध्यक्ष तथा जिल्हा सचिव श्री राजेश जाधव, क्रीडा शिक्षक महासंघाचे विभागीय अध्यक्ष तथा जिल्हा कार्याध्यक्ष प्रशांत कोल्हे, ज्येष्ठ सल्लागार प्रा.इकबाल मिर्झा, सहसचिव नितीन पाटील, युवा क्रीडा शिक्षक महासंघाचे सहसचिव जितेंद्र शिंदे, जळगांव जिल्हा माध्यमिक शिक्षक पतपेढीचे संचालक सिद्धेश्वर वाघुळदे,भुसावल माध्यमिक शिक्षक पतपेढीच्या संचालिका अश्विनी कोळी, यावल तालुका क्रीडा शिक्षक महासंघाचे अध्यक्ष मुख्याध्यापक के. यू. पाटील यांची उपस्थिती होती.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पुजन करून दीपप्रज्वलन करण्यात आले. यावल तालुका क्रीडा शिक्षक महासंघाचे अध्यक्ष मुख्याध्यापक के यु पाटील यांनी आपल्या प्रास्ताविकात तालुका महासंघाचे कार्य, तालुका स्पर्धा आयोजन यावर मार्गदर्शन केले तर सभेचे सूत्रसंचालन क्रीडाशिक्षक योगेश कोळी यांनी केले. क्रीडा शिक्षक सैय्यद अशफाक अली यांचा सेवानिवृत्तीबद्दल तर आदर्श क्रीडाशिक्षक पुरस्कार्थी के. आर. सोनवणे, यावल तालुका शिक्षक पतपेढीत संचालक म्हणून बिनविरोध निवडून आल्याबद्दल क्रीडा शिक्षक जितेंद्र फिरके यांचा शाल, श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला.
जिल्हा शिक्षक पतपेढीचे संचालक सिध्देश्वर वाघुळदे यांनी क्रीडा शिक्षक महासंघाचे कार्य यावर समाधान व्यक्त करून यावल तालुका क्रीडा शिक्षक महासंघास पाच हजार रुपयाची देणगी जाहिर केली. प्रशांत कोल्हे यांनी महासंघाच्या वाटचालीवर, महासंघ स्थापना, आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्कार, शासन दरबारी करावयाच्या मागण्या, अडचणी यावर मार्गदर्शन केले तसेच राजेश जाधव यांनी शारीरिक शिक्षण तासिका, संच मान्यता, पवित्र पोर्टल, शालेय स्पर्धा आयोजन, क्रीडा शिक्षक यांचे कर्तव्य व जबाबदारी यावर मार्गदर्शन केले सभेस तालुका क्रीडा समन्वयक श्री दिलीप संगेले, वाय.वाय.पाटील, उपमुख्याध्यापक आर एस जावळे, मुख्याध्यापक यु. टी. चौधरी, गोपाळ पाटील,विनित बोंडे, एन सी पाटील, सलीम शेख, साजीद शेख, वसीम शेख, शरीफ शेख, इमरान शेख, ललित बढे, काळकर यासह पदाधिकारी व क्रीडा शिक्षक यांची उपस्थिती होती सभेची सांगता राष्ट्रगीताने व नंतर स्नेहभोजनाने झाली.