जळगाव, प्रतिनिधी | इच्छुक उमेदवारांचा उत्कृष्ट प्रतिसाद लाभला. जिल्ह्यातील ११ विधानसभा क्षेत्रातून ४५-५० इच्छुकांनी मुलाखत दिल्या आहेत. जळगाव जिल्ह्यातून जास्तीत जास्त आमदार निवडून येतील अशी आशा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीस, माजी मंत्री डॉ. शोभा बच्छाव यांनी व्यक्त केली. त्या आज जळगाव जिल्ह्यातील विधानसभा क्षेत्रातील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यासाठी आल्या असता त्यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
याप्रसंगी ओबीसी विभाग अध्यक्ष प्रमोद मोरे, जिल्हा निवड मंडळ सदस्य जळगाव महानगर काँग्रेस कमिटी अध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी, डी. जी. पाटील, ललिता पाटील, उदय पाटील, देवेंद्र मराठे, भगतसिंग पाटील, जमील शेख, योगेश महाजन, निळकंठ फालक, ज्ञानेश्वर कोळी आदी उपस्थित होते. डॉ. बच्छाव पुढे म्हणाल्या की, या भागातील प्रश्न सोडवण्यासाठी त्यांचा उपयोग होईल. दोन ते तीन महिला उमेदवार देखील आल्या होत्या. याबाबत वरिष्ठ स्तरावर चर्चा होऊन निर्णय घेतला जाईल असे डॉ. बच्छाव यांनी सांगितले. तसेच कॉंग्रेसतर्फे जळगाव घेण्यात आलेल्या मुलाखतींना खूप मोठा प्रतिसाद मिळाला आहे. एका मतदार संघासाठी तीन ते चार उमेदवार होते. उमेदवार एकटा न येता त्याच्या समर्थकांन सोबत घेऊन आला होता. या विधानसभेत आमचे चांगले प्रदर्शन राहील असा आशावाद प्रमोद मोरे यांनी व्यक्त केला. इच्छुक उमेदवारांनी आपल्या मतदार संघाचा चागल्या प्रकारे आभ्यास केला होता हा विशेष महत्त्वाचा मुद्दा होता असे मत श्री. मोरे यांनी मांडले. जे निवडून येतील असाच उमेदवाराचे नाव वरिष्ठ पातळीवरुन जाहीर होईल असी आशा व्यक्त केली.