महिलेच्या गळ्यातील मंगलपोत धुमस्टाईल लांबविली

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील जुना खेडी रोडवरील सागर नगर येथे अज्ञात चोरट्याने दुचाकीवर येऊन पायी जात असलेल्या महिलेच्या गळ्यातून ४२ हजार रुपये किमतीची सोन्याची मंगलपोत चोरून नेल्याची घटना रविवारी ९ फेब्रुवारी रोजी रात्री ९.३० वाजता घडली आहे. या संदर्भात १० फेब्रुवारी रोजी मध्यरात्री १ वाजता शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

नेहा शांताराम चौधरी वय-३५, रा.जुना खेडी रोड, जळगाव या महिला आपल्या परिवारासह वास्तव्याला आहेत. रविवारी ९ फेब्रुवारी रोजी रात्री ९.३० वाजता जेवण झाल्यानंतर त्या शतपावली करण्यासाठी जुना खेडी रोडवरून पायी जात होत्या. त्यावेळी दुचाकीवर आलेला अज्ञात चोरट्याने त्यांच्या गळ्यातील ४२ हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगलपोत जबरी हिसकावून चोरून नेले. ही घटना घडल्यानंतर महिलेने आरडाओरड केली. परंतु तोपर्यंत दुचाकीस्वार चोरटा दुचाकीवरून पसार झाला होता. या संदर्भात महिलेने शनिपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार सोमवारी १० फेब्रुवारी रोजी मध्यरात्री १ वाजता पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पोलीस निरीक्षक रंगनाथ दारफडे करीत आहे.

Protected Content