मोबाईल टॉवरवरील रेडिओ फ्रिक्वेंसी मशीन चोरणाऱ्याला अटक

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जामनेर तालुक्यातील रोटवद येथील मोबाईल टॉवरवरील रेडिओ फ्रिक्वेंसी मशीन (AZNA कार्ड/आरआर युनिट) चोरी प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेने आरोपीला अटक केली आहे.

जामनेर तालुक्यातील रोटवद येथील मोबाईल टॉवरवरील रेडिओ फ्रिक्वेंसी मशीनची चोरी झाल्याची नोंद जामनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आली होती. ही चोरी परवेज उर्फ बबलू मेहमुद पिंजारी (रा. खंडेराव नगर, पिंप्राळा, जळगाव) याने केल्याची माहिती जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. त्यावरून पोलीसांनी संशयित आरोपीला अटक केली. त्याची चौकशी केली असताना गुन्ह्याची कबुली दिली. पुढील कारवाईसाठी संशयित आरोपीला जामनेर पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, आणि पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पथकातील पोलीस उपनिरीक्षक शेखर डोमाळे, पोलीस हवालदार संदीप पाटील, विष्णु बिर्‍हाडे, रणजीत जाधव, ईश्वर पाटील, राहुल महाजन, आणि प्रदीप सपकाळे यांनी केली आहे.

Protected Content