मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | सध्या राज्यात भटक्या जमातीत समावेश असलेल्या धनगर समाजाकडून अनुसूचित जमाती संवर्गातून आरक्षण देण्याची जोरदार मागणी केली जात आहे. या पार्श्वभूमीवर शासनाने धनगर आरक्षणासंदर्भात मोठे पाऊल उचलले आहे. धनगड असा उल्लेख असलेली ७ प्रमाणपत्रे रद्द करण्यात आली आहेत. धनगर किंवा धनगड यापैकी कोणताही उच्चार असला तरी त्याचा अर्थ समान असल्याचा दावाही धनगर समाजाकडून केला जात आहे. यामुळे धनगरांचा आरक्षणाचा मार्ग मोकळा होणार असल्याचे बोललं जात आहे.
एकदा दिलेला जात वैधता दाखला रद्द करण्याचा अधिकार सरकारने जात पडताळणी समितीला दिला आहे. जे बोगस धनगडांचे दाखले काढले होते. सध्या धनगर समाजाला भटक्या विमुक्त संवर्गातून आरक्षण आहे. अनुसूचित जमातीच्या यादी समाविष्ट धनगड आणि धनगर हे एकच असून इंग्रजीमध्ये आर ऐवजी डी असा शब्द वापरण्यात आला आहे. धनगरांचा समावेश अनुसूचित जमातीमध्ये झाला नाही, असा दावा धनगर समाजातर्फे करण्यात येतो.