जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील एमआयडीसीतील जे-सेक्टर मधील एका चटईच्या कंपनीतून त्याच कंपनीत काम करणारा मशीन ऑपरेटरने चटईसाठी लागणारा ३ हजार रूपये किंमतीचा प्लास्टिक मटेरीयल चोरून नेल्याची घटना रविवारी २७ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ वाजता समोर आली आहे. या संदर्भात बुधवारी ३० ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, प्रतीक दिलीप शहा वय-४०, रा. गणपती नगर, जळगाव यांचे जळगाव एमआयडीसीतील जे-सेक्टरमध्ये सिद्धांत इंडस्ट्रीज नावाची चटईची कंपनी आहे. रविवारी २६ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ ते २७ ऑक्टोबर सकाळी ८ वाजेच्या दरम्यान त्याच कंपनीत काम करणारा मशीन ऑपरेटर प्रवीण दिनेश पाटील रा.साईनगर, कुसुंबा, जळगाव याने चटई कंपनीसाठी लागणारा ३ हजार रुपये किमतीचा प्लास्टिक मटेरीयअलने भरलेले तीन पोते चोरून नेले. ही घटना उघडकीला आल्यानंतर कंपनीचे मालक प्रतीक यांनी बुधवारी ३० ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार संशयित आरोपी प्रवीण दिनेश पाटील रा. साईनगर, कुसुंबा ता. जळगाव यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ दत्तात्रय बडगुजर करीत आहे.