
जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील कुसुंबा गावात बंद घर फोडून ४० हजार रूपये किंमतीचे सोन्याचांदीचे दागिने चोरून नेल्याची घटना शुक्रवारी १२ जुलै रोजी सकाळी ६ वाजता उघडकीला आले आहे. याप्रकरणी शनिवारी १३ जुलै रोजी दुपारी १२ वाजता एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, योगेश संतोष बोरसे वय ४२ हा तरूण जळगाव तालुक्यातील कुसुंबा गावात वास्तव्याला आहे. खासगी नोकरी करून आपला उदरनिर्वाह करतो. ११ जुलै रोजी योगेशचे घर बंद असतांना अज्ञात चोरट्यांनी घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून घरातून ४० हजार रूपये किंमतीचे सोन्याचांदीचे दागिने चोरून नेले. हा प्रकार शुक्रवारी १२ जुलै रोजी सकाळी ६ वाजता उघडकीला आला. याप्रकरणी शनिवारी १३ जुलै रोजी दुपारी १२ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. त्यानुसार पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोहेकॉ रामकृष्ण पाटील हे करीत आहे.


