अविरत कार्याची प्रेरणा म्हणजेच पुरस्कार – महामंडलेश्वर जनार्दन हरिजी महाराज

सावदा प्रतिनिधी । समाज, राष्ट्र व मानवता प्रिय व्यक्ती अविरतपणे कार्य करून समाजासाठी काहीतरी चांगले करण्याचा प्रयत्न करीत असतो त्यातील चांगलेपणा शोधून पुरस्कारासाठी निवड होते. मात्र हाच पुरस्कार पुढे ही अविरत व अखंडपणे कार्य करण्याची प्रेरणा देतो, असे महामंडलेश्वर जनार्दन हरिजी महाराज यांनी आज सावदा येथे प्रतिपादन केले.

सावदा येथे ताप्ती सातपुडा जर्नलिस्ट असोसिएशनतर्फे आज ताप्ती सातपुडा राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला यावेळी विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्यांना हे पुरस्कार देण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सतपंथ रत्न महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज हे होते तर श्री शास्त्री भक्ती प्रसाद दासजी, आचार्य  सुरेश मानेकर, बाबा भक्ती प्रकाश दासजी या संत महंतसह प्रमुख उपस्थितीत जि.प.अध्यक्षा ना.रंजना पाटील, आ.शिरीष चौधरी, जिल्हा बँकेचे अध्यक्ष रोहिणी खडसे-खेवलकर, सावदा लोकनियुक्त नगराध्यक्षा अनिता येवले, माजी नगराध्यक्ष राजेंद्र चौधरी, राजेश वानखेडे, हाजी शब्बीर हुसेन, हाजी अख्तर हुसेन हे उपस्थित होते.

शिवजयंतीचे औचित्य साधून सावदा येथील सातपुडा जर्नलिस्ट असोसिएशनतर्फे घेण्यात आलेला हा उपक्रम पुरस्कारथीना प्रेरणादायक तर आहेच आहेच मात्र असोसिएशनने सर्व स्तरीय व विविध क्षेत्रातील पुरस्कारार्थी ची योग्य प्रकारे निवड करून त्यांचे समाज राष्ट्र मानवता यादृष्टीने ते कार्य करीत आहेत. या पुरस्काराने त्यांना अविरत व खंड कार्य करण्याची प्रेरणा मिळेल यासह पत्रकार हा समाजातील एकमेकांना जोडणारा पूल आहे. पत्रकार स्वतःच्या कुटुंबाची पर्वा न करता आपले कार्य करत राहतो. समाजाने पत्रकारांना काही द्यावे याची अपेक्षा न करता आपण समाजासाठी काहीतरी करत आहे व आपणही समाजाचे ऋणी आहोत म्हणून अशा प्रकारचे कार्यक्रम संस्थेने आयोजित करावे, यासह खरे कोरोना योद्धा म्हणून पत्रकारांना शासनाने मान्य केले पाहिजे. पत्रकारांसाठी विम्याचे कवच मिळावे कोरोना लस मिळण्यास पत्रकार व त्यांच्या कुटुंबांना प्राधान्य द्यावे, असे महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांनी आपल्या अध्यक्ष मनोगतात प्रतिपादन केले.

विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे हाजी शब्बीर हुसेन, हाजी फक्त हुसेन, राजेंद्र  चौधरी, कविता  पाटील, गणेश पाटील, डॉ. व्ही.एन. चौधरी, शेख हनिफ शेख शरीफ, प्रल्हाद अहिरे, वाय. एस. महाजन, डॉ. श्रीकांत चौधरी, सकाळचे संपादक राहुल रणाळकर, लोकमतचे संपादक मिलिंद कुलकर्णी, प्राचार्य व्ही.आर. पाटील, पुष्पा भारंबे, शेअरबाजार शे ईसामुद्दीन, अक्षय सुतार, निलेश लोहार, रिस्पेक्ट कलामंच क्रांती चौक मित्र मंडळ वृक्ष मित्र परिवार पूनित अरोरा या सर्वांना उपस्थिततर्फे शानदार समारंभात पुरस्कार वितरण करण्यात आले.

यावेळी साधू महंत सह व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष शामकांत पाटील, उपाध्यक्ष प्रवीण पाटील, सरचिटणीस अमोल दर्शी तायडे, कार्याध्यक्ष पंकज पाटील, प्रसिद्धीप्रमुख राजू दिपके, साजिद शेख, सल्लागार लाला कोष्टी, राजेंद्र भारंबे हे उपस्थित होते. यावेळी स्वामी भक्तीप्रसाद दासजी, आचार्य सुरेश शास्त्री मानेकर बाबाजी यांनी आपले मनोगत व्यक्त करून पुरस्काराथी यांना शुभेच्छा देऊन समाजाच्या जडणघडणीत पत्रकाराचा नेहमीच सहभाग असल्याचे सांगून समाजाचे आपण काही देणे लागतो. त्यादृष्टीने ताप्ती सातपुडा जर्नालिस्ट असोसिएशनचे कार्य उत्कृष्ट असल्याचे नमूद केले यावेळी रावेर यावल चे आमदार शिरीष दादा चौधरी यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमात सर्वात आधी शिवजयंतीनिमित्त शिवगर्जना तसेच शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे तसेच सर्व महामानवांचे पूजन करून दीप प्रज्वलन करण्यात येऊन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली प्रथम उपस्थित संत महात्म्यांचा सत्कार नंतर पुरस्कार प्राप्त गुणवंतांचा सत्कार भव्यदिव्य पद्धतीने करण्यात आला कार्यक्रमाचे प्रास्ताविक अमोन दर्शी तायडे सर यांनी केले येथील तर उत्कृष्ट असे सूत्रसंचालन नंदू पाटील सर यांनी केले जेहरा मॅरेज हॉल मध्ये झालेल्या या शानदार सोहळ्याला परिसरातून मोठ्या संख्येने सर्वस्तरीय नागरिकांची उपस्थिती होती.

ताप्ती सातपुडा जर्नलिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष शामकांत पाटील, उपाध्यक्ष प्रवीण पाटील, अनुमदर्शी तायडे, पंकज पाटील, राजीव दिपके, साजिद शेख, लाला कोष्टी, राजेंद्र भारंबे, पिंटू कुलकर्णी, मिलिंद टोके, रवींद्र हिवरकर, रोशन वाघुळदे, मिलिंद कोरे, दिलीप भारंबे, कमलाकर पाटील, संजीव चौधरी, अज्जू शेख, पंकज बोदडे, राजेश पाटील, विकी भिडे, सिद्धार्थ तायडे, आनंद भालेराव, भारत हिवरे, कमलाकर माळी, विलास ताठे, योगेश सैतवाल, संतोष नवले इत्यादी पत्रकार हजर राहून परिश्रम घेतले .

 

Protected Content