सोलापूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | चारित्र्याच्या संशयातून पत्नीची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार सोलापूर मधून समोर आला आहे. साखर झोपेत असलेल्या पत्नीचा डोक्यात दगड घालून खून केला. ही घटना सोलापूर जिल्ह्यातील तेलगाव भीमा येथे घडली.या घटनेनेपरिसरातखळबळ उडाली असून या प्रकरणी पतीसह तिघांविरोधात गुन्हादाखल करण्यात आला आहे. भाग्यश्री बसवराज कोळी असे हत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. तर बसवराज आडव्याप्पा कोळी असे आरोपी पतीचे नाव आहे. या प्रकरणीपतीसहशिवानंद आडव्यापा कोळी आणि गजानन आडव्यापा कोळी यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणीचंद्रकांत कोळी यांनी पोलिसांत धाव घेत फिर्याद दिली होती.
मिळालेल्या माहितीनुसार बसवराज कोळी आणि भाग्यश्री यांचा २०१४ मध्ये विवाह झाला होता. दोन वर्षापासून हे दाम्पत्य निम्बर्गीतील शेतातील घरात रहात होता. दाम्पत्यामध्ये गेल्या काही महिन्यांपासून वाद सुरू होता. ही गोष्ट बसवराज याने भाग्यश्रीच्या आई-वडिलांना सांगितली होती. भाग्यश्रीचे माहेर लोणी आहे. बसवराजने सासरवाडीत गेल्यावर पत्नी ऐकत नाही. नेहमी भांडत असल्याची तक्रार दिली. त्यानंतर बसवराजने मेव्हणा चंद्रकांत कोळीला तेलगावला बोलावून घेतले
बसवराजने मेव्हण्याकडे तक्रार करताना म्हटले की, तुझ्या बहिणीचे चारित्र्य चांगले नसल्याचे सांगितले. तिने निंबर्गी येथील एकासोबत अनैतिक संबंध असल्याचे सांगितले. त्यांनी दोघांनाही समजावले होते. मात्र बसवराजचा राग गेला नव्हता. त्याने याच रागातून पत्नीची हत्या केली. २३ जून रोजी रविवारी रात्री झोपल्यानंतर बसवराजने तिच्या डोक्यात दगड घालून तिची हत्या केल्याची माहिती फिर्यादीने दिली आहे. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.बसवराजच्या भावाने भाग्यश्रीची हत्या केलेली जागा दाखवली. घटनास्थळी बांगड्याचे तुकडे पडलेले दिसले.भाग्यश्रीच्या डोक्यात घालून तिची हत्या केलेल्या ठिकाणी फरशी फुटून खड्ड पडला होता.या घटनेनंतर आरोपी पतीने व त्याच्याभावांनी पुरावा नष्ट करण्यासाठी मृत भाग्यश्रीचे रक्ताने माखलेले कपडे,अंथरुण जाळून टाकले. या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे.