Home राष्ट्रीय गृहमंत्र्यांनी दिला शहीद जवानाच्या पार्थिवाला खांदा

गृहमंत्र्यांनी दिला शहीद जवानाच्या पार्थिवाला खांदा


 

श्रीनगर (वृत्तसंस्था) पुलवामा जिल्ह्यात दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी बडगाममध्ये श्रद्धांजली वाहिली. यावेळी सिंह यांनी शहीद जवानांच्या पार्थिवाला खांदाही दिला. या हल्ल्यातील सर्व शहीद जवानांची पार्थिव शरीरे दिल्लीत आणण्यात येत आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षणमंत्री निर्मला सीतारमन हल्ला करणाऱ्यांना सोडणार नाही. जवानांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही. बदला घेतल्याशिवाय गप्प बसणार नाही, असं गृहमंत्री सिंह यांनी गुरुवारी ठणकावून सांगितले होते. सुरक्षा दलांना दहशतवाद्यांविरोधात कारवाई करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य देण्यात आले आहे, असं पंतप्रधान मोदींनी आज सुरक्षा समितीच्या बैठकीनंतर एका सभेला संबोधित करताना म्हटले होते. दहशतवाद्यांनी घोडचूक केली आहे. या हल्ल्यात सहभागी असणाऱ्यांना सोडणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला होता. शहीदांना श्रद्धांजली वाहण्यासाठी ते पालम विमानतळावर जाणार आहेत, असं सांगण्यात येत आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound