शिक्षक विद्यादानाचे पवित्र कार्य करतात : डॉ.स्नेहल फेगडे

c11588a1 edc9 4583 a97b ac7c5ce6c670

 

जळगाव (प्रतिनिधी) विद्यार्थी घडवण्याचा तसेच आदर्श नागरिक बनविण्याचे पवित्र कार्य शिक्षक करत असतात, असे मनोगत डॉ. स्नेहल फेगडे यांनी व्यक्त केले. ते सरस्वती विद्यामंदिर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात गरीब-गरजू-होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप कर्यक्रम प्रसंगी बोलते होते.

जळगाव शहरातील शिव काँलनी येथील सरस्वती विद्यामंदिर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय येथे नेहरू युवा केंद्र (भारत सरकार) संलग्न मौलाना आझाद अल्पसंख्यांक समाज विकास फाऊंडेशनने गरीब-गरजू-होतकरू ८० विद्यार्थ्यांना नुकतेच शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.

 

यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना मनोज पाटील म्हणाले की,समाज कार्य करण्यास मनाची तयारी लागते. भारतरत्न मौलाना आझाद यांचे नाव सुवर्णअक्षरात कोरले गेले आहे.बदलत्या जगाबरोबरच देशासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा विसर पडताना आपल्याला दिसून येत आहे. बांबरुड (राणीचे) येथील आदर्श शेतकरी मयुर अरुण वाघ, धरणगाव येथील कर्तव्य बहुद्देशीय संस्थेचे अध्यक्ष सुनील पंढरीनाथ चौधरी,पाळधी येथील रोहिणी झंवर यांनी कार्यक्रमाला विशेष सहकार्य केले. या वेळी स्वामी समर्थ संस्थाचे अध्यक्ष व ग.स सोसायटीचे अध्यक्ष मनोजकुमार पाटील, मौलाना आझाद अल्पसंख्याक फाउंडेशनचे अध्यक्ष फिरोज शेख, डॉ. स्नेहल फेगडे, मनोज भालेराव, चेतन निंबोळकर, गणेश जोशी यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

 

यावेळी सूत्रसंचालन सुवर्णलता अडकमोल यांनी केले. प्रास्ताविक प्राध्यापक मनोज भालेराव यांनी तर आभार सविता ठाकरे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी कल्पना वसाणे,सुदर्शन पाटील, सुवर्णलता अडकमोल,सविता ठाकरे,नीलिमा भारंबे, उज्ज्वला ब्राह्मणकर,मानसी जगताप, अनिता सिरसाठ,सीमा जोशी यांनी परिश्रम घेतले.

Protected Content