जळगाव, प्रतिनिधी | केसीई सोसायटी संचलित ओरियोन इंग्लिश मीडियम स्टेट बोर्ड स्कूल तर्फे डॉ.अण्णासाहेब जी.डी.बेंडाळे स्मृतीप्रीत्यर्थ व के.सी.ई. सोसयटी अमृत महोत्सवी वर्षानिम्मित भव्य वृक्ष लागवड आणि पृथ्वी बचाव उपक्रमांतर्गत केंद्र सरकार यांच्या संयुक्त सहकार्याने वृक्षरोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
जळगाव जवळील हिंगणे गावाजवळ हा कार्यक्रम पार पडला यावेळी बहुसंख्य विद्यार्थ्यांनी हिरीरीने भाग घेतला आणि आपण या समाजाचं काहीतरी देणं आहोत या भावनेने मुलांनी आपली जबाबदारी आनंदाने पार पडली . या ठिकाणी प्रथम वृक्षारोपण कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून प्रभु देसाई (मॅनेजर सुप्रीम कंपनी गाडेगाव) यांची विशेष उपस्थिती होती तर उपवनरक्षक दि.वा. पगार तसेच श्री शिरवाडे (सहाय्यक वनरक्षक), वनपरिक्षेत्र अधिकारी एन जी पाटील, ओरियन स्कूल प्राचार्य संदीप साठे, सरपंच (हिंगणे), सरपंच (गाडेगाव) आणि इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते. यांनी एक एक रोपाची लागवड केली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी शिक्षकांनी वृक्षारोपण केले. विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमात खूप आनंदाने श्रमदान केले आणि पूर्ण दिवस निसर्गाच्या सानिध्यात राहून आपण समाजाचे देणे लागतो ही भावना वाढीस लागावी निसर्ग वाचला तरच मानवाची पिढी जगू शकते ही सामाजिक जाणिवेची भावना निर्माण झाली.सर्व मुलांनी निसर्गमित्र बनून भावी पिढीच्या उज्वल भविष्यासाठी वृक्षारोपण करून माणुसकीचा पाया उभा केला आणि यातूनच श्रमप्रतिष्ठा, सामाजिक जाणीव, निसर्गमित्र ,जबाबदार नागरिक निर्माण करणं ,परिस्थितीशी तोंड देणं, परिस्थितीशी जुळवून घेणे हा शाळेचा यामागील उद्देश होता तो पूर्ण झाला.