मुंबई (वृत्तसंस्था) शासकीय कार्यालयांमध्ये अनेकदा कर्मचारी, अधिकारी जेवायला गेले आहेत, नंतर किंवा उद्या या… अशा शब्दात सर्वसामन्यांची बोळवण केली जाते. दीड-दोन तासांनंतरही संबंधित अधिकारी जागेवर येत नाही. यामुळे अनेक दिवसांपासून नागरिकांनी शासनाकडे तक्रारी केल्या होत्या. अखेर त्यावर राज्य सरकारने पाऊल उचलल सरकारी बाबूंना दुपारी १ ते २ या वेळेतच उरकावे, असा नवीन अध्यादेश काढला आहे.
शासनाने शासकीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या भोजनवेळ निश्चित करण्यासाठी आदेश काढला आहे. यामुळे आता दुपारच्या कार्यालयीन भोजनाची वेळ निश्चित करण्यात आली आहे. राज्य सरकारच्या ३१ ऑगस्ट १९८८ च्या शासन निर्णयानुसार राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांतील कामकाजाच्या वेळा निश्चित करण्यात आल्या आहेत. कार्यालयीन वेळेत अर्धा तासाची भोजनाची सुट्टी असेल, ही बाबसुद्धाही त्यात स्पष्ट आहे. तसेच १८ सप्टेंबर २००१ च्या शासन परिपत्रकाद्वारे मंत्रालयीन अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी दुपारी १ ते २ या वेळेत जास्तीत जास्त अर्धा तासाची वेळ जेवणासाठी असावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.