जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील खोटे नगर ते गुजराल पेट्रोल पंपकडे जाणाऱ्या रोडवरील मॉ प्लायवुड दुकानासमोरून पायी जात असलेल्या महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत दुचाकीवरील अज्ञात दोन जणांनी धुमस्टाईल लांबविल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली आहे.
याप्रकरणी शनिवारी १४ ऑक्टोबर रोजी रात्री साडेबारा वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सिमा युवराज पाटील (वय-४०) रा. खोटे नगर, जळगाव या महिला आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. शुक्रवार १३ ऑक्टोबर रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास पायी जात होत्या. त्यावेळी त्यांच्या मागून अज्ञात दोन जण दुचाकीवर येवून त्यांच्या गळ्यातील ३० हजार रूपये किंमतीची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली आहे.
त्यावेळी महिलेले आरडाओरड केली परंतू तोपर्यंत दुचाकीवरील दोघेजण पसार झाले होते. यानंतर महिलेने तातडीने जळगाव तालुका पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अनंत अहिरे करीत आहे.