Home Cities अमळनेर बसस्थानक आवारात महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसुत्र लांबविले

बसस्थानक आवारात महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसुत्र लांबविले


अमळनेर लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर बसस्थानकामध्ये बसमध्ये चढत असताना एका महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना बुधवारी १३ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता घडली आहे. याप्रकरणी गुरुवारी १४ नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

या संदर्भात मिळालेली माहिती अशी की, दिपाली दिनेश पाटील वय-२४, रा. बहादरपूर ता. पारोळा या विवाहित आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. कामाच्या निमित्ताने त्या बुधवारी १३ नोव्हेंबर रोजी अमळनेर शहरात आल्या होत्या. दरम्यान सायंकाळी ५ वाजता त्या बहादरपुर येथे जाण्यासाठी अमळनेर बसस्थानकात बसमध्ये चढत असताना अज्ञात चोरट्याने त्यांच्या गळ्यातील १२ ग्रॅम वजनाची ९६ हजार रुपये किमतीची सोन्याचे मंगळसूत्र चोरून नेले. ही घटना उघडकीला आल्यानंतर त्यांनी सर्वत्र शोध घेतला. परंतु त्या संदर्भात कोणतीही माहिती मिळाली नाही. अखेर गुरुवारी १४ नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रमोद पाटील करीत आहे.


Protected Content

Play sound