महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र धूमस्टाईल लांबविले; शनिपेठ पोलिसात गुन्हा दाखल

जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | पाणीपुरी खाण्यासाठी पायी जात असलेल्या सपना भूषण पवार (वय २६, रा. खेडी बुद्रुक, ता. जळगाव) या महिलेच्या गळ्यातून दुचाकीवरुन आलेल्या चोरट्यांनी ११ ग्रम वजनाचे मंगलपोत जबरीने चोरुन नेली. ही घटना गुरुवारी ९ जानेवारी रोजी रात्री ८.३० वाजेच्या सुमारास शंभरफुटी रस्त्यावरील हॉटेल शामबा पॅलेस समोर घडली. याबाबत शनिपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव तालुक्यातील खेडी ब्रुदूक येथे सपना भूषण पवार या विवाहीता वास्तव्यास आहे. गुरुवारी ९ जानेवारी रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास त्या जेठाणी स्वाती पवार व मुलगी रियांशू यांच्यासोबत गावातून कालंका माता चौफुलीजवळ फिरण्यासाठी आणि पाणीपुरी खाण्यासाठी जात होत्या. यावेळी शंभरफुटी रस्त्यावरील हॉटैल शामबा पॅलेस समोरू न पायी जात असतांना एक अनोळखी दुचाकीस्वार तोंडाला रुमाल बांधून त्यांच्या समोर आला. त्याने सपना पवार यांच्या गळ्यावर जोरात हात मारुन त्यांच्या गळ्यातील ११ ग्रॅम वजनाची ५० हजार रुपये किंमतीची सोन्याची पोत जबरीने ओढून तो अंधाराचा फायदा घेत तेथून पसार झाला.

धूम स्टाईल आलेल्या चोरट्याने विवाहितेच्या गळ्यातून सोनपोत चोरुन नेल्यामुळे त्या महिला प्रचंड घाबरुन गेल्या होत्या. त्यांनी घटनेची माहिती आपल्या कुटुंबियांना दिली. त्यानुसार शुक्रवारी 10 जानेवारी रोजी मध्यरात्री एक वाजता अज्ञात चोरट्याविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास उपनिरीक्षक योगेश ढिकले हे करीत आहे.

Protected Content