Home क्राईम महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी धुमस्टाईल लांबविली !

महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी धुमस्टाईल लांबविली !

0
133

जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । कार्यक्रमाहून परतत असतांना घराजवळच मोपेड दुचाकीवरुन आलेल्या चोरट्यांनी अनिता अरुण ढाके (वय ४८, रा. अयोध्यानगर) यांच्या गळ्यातून ८ ग्रॅमची पोत आणि १० ग्रॅमची सोन्याची चैन जबरीने ओढून चोरुन नेली. ही घटना अयोध्या नगरातील संजीवनी अपार्टमेंटजवळ घडली. याप्रकरणी एमआडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

जळगाव शहरातील अयोध्या नगरात अनिता अरुण ढाके या महिला वास्तव्यास आहे. रविवारी १६ नोव्हेंबर रोजी एक कार्यक्रम आटोपून त्या १६ नोव्हेंबर रोजी दुपारी ४ वाजता दुचाकीने अयोध्या नगरातील घरी जाण्यासाठी निघाल्या.

घराजवळील संजीवनी अपार्टमेंटजवळ पोहचल्यानंतर गाडीवरुन उतरत असतांना मोपेड दुचाकीवरुन दोन इसम त्यांच्याजवळ आले. त्यातील एकाने गाडी काही अंतरावर थांबवली तर दुसरा हा त्यांच्याकडे पायी आला. त्या संशतियाने अनिता ढाके या महिलेच्या गळ्यातील ४० हजारांची ८ ग्रॅमची पोत आणि ५० हजारांची १० ग्रॅमची सोन्याची चैन जबरीने चोरुन नेली.

गळ्यातून सोन्याची पोत आणि चैन जबरीने ओढून तो चोरटा काही अंतरावर उभ्या असलेल्या दुचाकीवरुन पसार झाला. महिलेने आरडाओरड केली मात्र तो पर्यंत चोरटे तेथून पसार झाले होते. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


Protected Content

Play sound