Home क्राईम शिरसोली येथे तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या

शिरसोली येथे तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या

0
48

3suicide 163

जळगाव ( प्रतिनिधी ) शिरसोली येथे तरुणीने घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सकाळी १० वाजेच्या सुमारास उघडकीस आली. याबाबत पोलिसात नोंद घेण्याचे काम सुरू होते.

याबाबत माहिती अशी की, उज्वला भगवान आस्वार (बारी) (वय २४, रा. शिरसोली प्रा.बो. तालुका जि. जळगाव येथे घरात कोणी नसताना गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सकाळी दहा वाजेच्या सुमारास उघडकीस आली, मुलीचा मृतदेह पाहून वडील व भाऊ यांनी हंबरडा फोडला होता. तातडीने तिला जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता त्याला वैद्यकीय अधिकार्‍यांनी मृत घोषित केले. एमआयडीसी पोलीस या घटनेबाबत अकस्मात मृत्यूची नोंद घेण्याचे काम सुरू होते. मयत मुलीच्या पश्चात वडील, मोठी बहीण, दोन भाऊ आणि काका असा परिवार आहे, ज्या वेळेस तिने गळफास घेतला त्यावेळी वडील आणि दोघे भाऊ शेतात कामाला गेले होते तर आई कामानिमित्त बाहेर गेली होती.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound