भुसावळ प्रतिनिधी । शहरातील द्वारका नगरातील ७ नं. पोलीस चौकी परिसरातून १७ वर्षीय तरुणीला फूस लावून पळवून नेल्याची घटना घडली असून याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील द्वारका नगर भागातील महिलेने शहर पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार त्यांची १७ वर्षीय मुलगी ही काल (ता.७) सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास दुकानावरून दूध घेण्यासाठी घरातुन निघुन गेली. मात्र परत न आल्याने तीचा आजुबाजुला शोध घेतला असता ती मिळुन आली नाही. तिला कुणीतरी अज्ञात इसमाने फुस लावून पळवून नेले. म्हणून अज्ञात इसमाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.