जळगाव (प्रतिनिधी) घराच्या छतावर चढल्यानंतर पत्र्यात उतरलेल्या विजेचा धक्का लागून शिरसाळा येथील हर्षदा संजय धनगर (वय-८) ही बालिका जखमी झाल्याची घटना रविवारी दुपारी १.३० वाजता घडली़. कुटूंबियांनी तिला लागलीच जिल्हा रूग्णालयात उपचारार्थ दाखल केल्यानंतर प्रकृती स्थिर असल्याचे समजते़.
हर्षदा दुपारी घराच्या छतावर कामानिमित्त आली होती़ मात्र, घराच्या छतावरील पत्र्यांमध्ये वीजप्रवाह उतरल्यामुळे तिला जोरदार धक्का लागला आणि ती खाली जमिनीवर कोसळली़. हा प्रकार कुटूंबियांना कळताच त्यांनी हर्षदाला घेऊन तत्काळ जिल्हा रूग्णालयात गाठले़. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तत्काळ प्राथमिक उपचार केल्यानंतर तिची सध्या प्रकृती स्थिर आहे.