जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील गोलाणी मार्केट मधील लिप्टला रविवारी १३ नोव्हेंबर रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. बंदावस्थेत असलेल्या लिप्टमधील कचऱ्याला आग लागल्याचे समोर आले. या आगीत कोणतेही आर्थीक नुकसान झालेले नाही.
याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील मध्यवर्ती भागात असलेले गोलाणी मार्केट मधील विंग ई मध्ये बंदावस्थेत असलेल्या लिप्टला रविवारी १३ नोव्हेंबर रोजी दुपारी अचानक लागली होती. दरम्यान, रविवार असल्याने बहुतेक दुकाने बंद होती. त्यामुळे कुणाच्या लक्षात आले नाही. थोड्यावेळाने येथील दुकानदारांच्या लक्षात आल्याने त्यांनी तातडीने धाव घेतली व महापालिकेच्या अग्निशमन विभागाशी संपर्क साधून माहिती दिली. अगदी हाकेच्या अंतरावर असलेले अग्नीशमन बंब काही मिनीटाच गोलाणी मार्केट परिसरात दाखल झाली. अवघ्या २० मिनीटात अग्निशमन विभागाच्या बंबाने आगीवर नियंत्रण मिळविले. याप्रसंगी दुकानदारांनी देखील आग विझविण्यास सहकार्य केले. ही आग कोणत्या कारणामुळे लागली हे स्पष्ट झालेले नाही. विभागाचे अधिक्षक शशिकांत बारी यांच्या मार्गदर्शनाखाली फायरमन रोहिदास चौधरी, वाहन चालक देविदास सुरवाडे, वाहनचालक संतोष तायडे, फायरमन भगवान पाटील यांच्यासह आदींनी सहकार्य होते.